१. ॲपचा उद्देश
'सातारा रेंटल हब' हे केवळ एक माहिती देणारे प्लॅटफॉर्म (माध्यम) आहे. साताऱ्यातील घरमालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये थेट संपर्क घडवून आणणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. आम्ही स्वतः कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी-विक्री किंवा भाडेतत्वावर देण्याचे काम करत नाही.
२. वापरकर्त्याची जबाबदारी
ॲपवर दिसणारी कोणतीही प्रॉपर्टी भाड्याने घेताना किंवा खरेदी करताना, संबंधित घरमालकाची, कागदपत्रांची आणि जागेची खात्री स्वतः वापरकर्त्याने (युझरने) करावी. कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीस किंवा खोट्या माहितीस ॲप प्रशासन जबाबदार राहणार नाही.
३. आर्थिक व्यवहार (Payments)
- घरमालकाला ॲडव्हान्स (Deposit) किंवा भाडे देण्यापूर्वी घर प्रत्यक्ष जाऊन पाहणे अनिवार्य आहे.
- कधीही फोनवर बोलून अनोळखी व्यक्तीला ऑनलाईन पैसे (Google Pay/PhonePe) पाठवू नका.
- आमच्या ॲपवर नंबर अनलॉक करण्यासाठी घेतलेली फी (उदा. ₹२०) किंवा सबस्क्रिप्शन फी कोणत्याही परिस्थितीत परत (Refund) केली जाणार नाही.
४. खाते ब्लॉक करणे
जर कोणत्याही युझरने किंवा घरमालकाने ॲपवर चुकीची माहिती, चुकीचे फोटो, किंवा स्पॅम ॲड टाकण्याचा प्रयत्न केला, तर ॲडमिनला त्याचे खाते (Account) पूर्वसूचनेशिवाय कायमचे ब्लॉक करण्याचा अधिकार आहे.